भिगवण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकनेते राजेंद्रकुमारजी घोलप खाजगी द्योगिक प्रशिक्षण संस्था ( ITI )

भिगवण ता. इंदापूर जि. पुणे

दिल्ली बोर्ड मान्यता प्राप्त DGT-Aff011/7/2025-O/o Dir(TC)-E-File No72107

प्राचार्य

श्री. जामदार अतुल अंकुश

प्राचार्य मनोगत

 

प्रिय प्रशिक्षनार्थी, पालक, उद्योग क्षेत्रातील सहकारी व संकेतस्थळाला भेट देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत.

 

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) ही केवळ कौशल्य प्रशिक्षण देणारी संस्था नसून, शिस्त, मूल्ये, तांत्रिक ज्ञान आणि रोजगारक्षम कौशल्ये विकसित करणारे एक सक्षम व्यासपीठ आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात उद्योगांच्या गरजा ओळखून, प्रशिक्षणार्थ्याना आधुनिक साधने, अद्ययावत अभ्यासक्रम आणि अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यास आमची संस्था कटिबद्ध आहे.

 

आमच्या संस्थेमध्ये विविध व्यवसायांतील (Trades) प्रशिक्षण, प्रात्यक्षिकांवर भर, उद्योगभेटी, अप्रेंटिसशिप व रोजगार मार्गदर्शन उपक्रम राबविले जातात. प्रशिक्षणार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्ता, सुरक्षित व स्वच्छ परिसर, शिस्तबद्ध वातावरण आणि नैतिक मूल्यांची जोपासना यावर विशेष लक्ष दिले जाते.

 

प्रशिक्षणार्थ्यांनी आत्मविश्वास, मेहनत आणि सतत शिकण्याची वृत्ती ठेवून प्रशिक्षण पूर्ण करावे, हीच अपेक्षा आहे. पालक, उद्योग भागीदार आणि समाज यांच्या सहकार्याने आम्ही रोजगाराभिमुख व सक्षम मनुष्यबळ घडविण्यास सदैव प्रयत्नशील आहोत.

 

संस्थेच्या प्रगतीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानून, प्रशिक्षणार्थ्यांचा उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.

 

— प्राचार्य,

जामदार A. A

लोकनेते राजेंद्रकुमारजी घोलप खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( pvt.ITI)